Logo

सिन्नर सार्वजनिक वाचनालय

सरकारमान्य ,मुक्तद्वार तालुका 'अ' वर्ग वाचनालय.

राजा फत्तेसिंग मार्ग, शिवाजी चौक,सिन्नर जि. नाशिक.

सिन्नर सार्वजनिक वाचनालयात आपले स्वागत आहे!

Sinnar Library

आपल्या समृद्ध ग्रंथसंपदेचा लाभ घेण्यासाठी वरील 'डिजिटल सूची' विभागात जावे.

वाचनालय वेळ

सकाळी १०.०० ते सायं ७:३०

अभ्यासिका वेळ

सकाळी ६:०० ते रात्री १०:००

सर्व पुस्तके
पुस्तके लोड होत आहेत...
1 / 1
सिन्नरचे 'ज्ञान' मंदिर

सिन्नर सार्वजनिक वाचनालय

सिन्नर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या अनेक वास्तू, मंदिरे, वेशी, वाडे यांच्या पाऊलखुना स्पष्टपणे आजही उमटलेल्या आहेत. शहराला ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय व उद्योजकांची श्रीमंती लाभली आहे. यात एक अनमोल श्रीमंतीचा खजिनाही दडलेला आहे. तो खजिना अर्थातच वाचन संस्कृतीचा, सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचा!

दोन सभागृहांसह, सुसज्ज ग्रंथालय, पुस्तक देवघेव विभाग, वृत्तपत्रे व नियतकालिके वाचनासाठी येणाऱ्या वाचकांसाठी मुक्तद्वार वाचनालय, महिला अभ्यासिका यांचा समावेश असलेली वाचनालयाची दोन मजली सुसज्ज इमारत शहराच्या मध्यवर्ती भागात डौलाने उभी आहे. १५ एप्रिल १९४५ रोजी स्थापन झालेल्या या वाचनालयाने आपल्या कार्याची ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण केली आहेत व राज्यातील तालुकास्तरावरील कायम 'अ' दर्जा प्राप्त केला आहे.

इतिहास आणि विकास

१५ एप्रिल १९४५ या दिवशी घरोघरी गुढी पाडव्याच्या गुढ्या उभ्या राहत असतानाच साहित्यिक व वाचन संस्कृतीची समृद्ध अशी पताका सिन्नर शहरात फडकली. डॉ. माधवराव गुजर, गोविंदराव भट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शक्ती विडी कामगार संघाने दिलेला भूखंड आणि ५००१ रुपयांची देणगी या वाचनालयाच्या उभारणीत पाया ठरली. १९८४ मध्ये वाचनालय स्वतःच्या सुसज्ज इमारतीत स्थलांतरित झाले. वाचनालयाची अर्धी इमारत शक्ती विडी कामगार संघाने उभारलेल्या निधीतून उभारण्यात आली व बाकी उर्वरित जागेवर महाराष्ट्र शासन, राजाराम मोहनराय ट्रस्ट, ज्येष्ठ उद्योजक देवकिसन सारडा आणि इतर काही सेवाभावी दानशूर संस्था आणि व्यक्तींच्या मदतीतून नवी इमारत उभी राहिली यात मुष्ठी फंड योजनेचेही मोठे योगदान राहिले असून सिन्नरकरांनी यासाठी नेहमीच भरभरून दाद दिली आहे.व्यावसायिक अनंत राजेगावकर यांनी वाचनालयाचे दुसरे सभागृह त्यांचे वडील कै. केशवराव राजेगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधून दिले.

ग्रंथालय सप्ताह विशेष

दरवर्षी १८ ते २४ नोव्हेंबर या काळात "ग्रंथालय सप्ताह" साजरा होतो. या ग्रंथालय सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव ( ५० वर्षे) नुकताच साजरा झाला आहे. गेल्या अनेक दशकांत या व्यासपीठावर देशातील आणि राज्यातील नामांकित साहित्यिक, विचारवंत आणि कलावंतांनी उपस्थिती दर्शवली आहे.

येथील व्यासपीठ भूषवलेले काही प्रमुख वक्ते:

वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज, प्राचार्य शिवाजीराव भोसले, रणजीत देसाई, प्राचार्य राम शेवाळकर, विणा गवाणकर, सुधीर गाडगीळ, जगदीश खेबुडकर, अशोक नायगावकर, डॉ. विश्वास मेहेंदळे, चंदाताई तिवाडी, भाऊसाहेब थोरात, मंगला खाडीलकर, विश्वास पाटील, प्रवीण दवणे, डॉ. मिर्झा बेग, चंद्रकांत महामिने, प्रभाकर झळके, रावसाहेब शिंदे, रामदास फुटाणे, इसाक मुजावर, आशाताई पाटील, डॉ. विणा देव, द्वारकानाथ संझगिरी, निनाद बेडेकर, स्वाती टोकेकर, पद्मभूषण देशपांडे, इंद्रजीत भालेराव, सुरेश भटेवरा, प्रा. हरी नरके, चारुदत्त दीक्षित, नंदन रहाणे, श्रीकांत पूर्णपात्रे, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, वेदश्री थिगळे, प्रा. सुभाष वारे, गणेश चंदनशिवे, प्रकाश पाठक, हेरंब कुलकर्णी, श्यामसुंदर सोन्नर, गुरु ठाकूर यांसारख्या अनेक दिग्गजांचा यात समावेश आहे.

अत्याधुनिक सुविधा

वाचनालयाची ग्रंथसंपदा ४० हजारांच्या पुढे गेली आहे. येथे पुस्तक देवघेव विभाग, वर्तमानपत्र विभाग,दोन मोठी सभागृहे (कै. वसंतकाका देशपांडे आणि कै. केशवराव राजेगावकर सभागृह), आणि ६० विद्यार्थिनींची आसन क्षमता असलेली अत्याधुनिक महिला अभ्यासिका उपलब्ध आहे.

देणगीदार कृतज्ञता

सिन्नरचे भूमिपुत्र कै. जगन्नाथ गंगावणे यांनी ३२ वर्षांपूर्वी सुरू केलेला वारसा त्यांचे सुपुत्र सुधीर व शिल्पा गंगावणे गेल्या १५ वर्षांपासून पुढे चालवत आहेत. आजवर त्यांनी ६.२५ लाख रुपयांची ३,००० पुस्तके भेट दिली आहेत.

सामाजिक सेवाभावी उपक्रम

उद्योजक अरुण कलंत्री यांच्या सहकार्याने ७ लाख रुपयांचे वैद्यकीय रुग्ण साहित्य (बेड, व्हिलचेअर इ.) गरजूंना मोफत पुरवले जाते.

पुरस्कार

वाचनालयाला महाराष्ट्र शासनाचा १९९०-९१ चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, अध्यक्ष कृष्णाजी भगत यांना २००६-७ चा उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार आणि म.वि.प्र. समाजाचा उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

वर्गणीचे दर

वर्ग क्र. वाचक वर्गीकरणासाठी घेण्यात येणारे वाचन साहित्य प्रवेश फी (₹) अनामत रक्कम (₹) दरमहा वर्गणी (₹)
1 एक पुस्तक 10/- 300/- 10/-
2 दोन पुस्तके 10/- 400/- 20/-
3 एक मासिक 10/- 15/- 15/-
4 एक पुस्तक व एक मासिक 10/- 350/- 25/-
5 दोन पुस्तके व एक मासिक 10/- 450/- 30/-

अधिक माहितीसाठी वाचनालयाच्या कार्यालयात संपर्क साधावा .

विद्यमान संचालक मंडळ
अध्यक्ष
श्री. कृष्णाजी भगत
कार्यवाह
श्री. हेमंत वाजे
उपाध्यक्ष
श्री. नरेंद्र वैद्य
उपाध्यक्ष
श्री. राजेंद्र देशपांडे
संचालक
श्री. मनीष गुजराथी
संचालक
श्री. विलास पाटील
संचालक
श्री. जितेंद्र जगताप
संचालक
श्री. सागर गुजर
संचालक
श्री. सुनील उगले
संचालक
श्री. उज्वल पंडित
संचालक
श्री. मनोजकुमार भंडारी
संचालक
सौ. निर्मल खिंवसरा
संचालक
सौ. माधवी पंडित

संपर्क व पत्ता

सिन्नर सार्वजनिक वाचनालय

राजा फत्तेसिंग मार्ग,

छ.शिवाजी महाराज चौक,

सिन्नर (जि. नाशिक) पिन - ४२२१०३

फोन: ९३७०२ ८३३४६ | ईमेल:

गूगल मॅपवर दिशा पहा
Instagram वर फॉलो करा
तुमची प्रतिक्रिया / सूचना नोंदवा

* आपल्या सूचनांचे स्वागत आहे.